अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार, महायुतीत मिठाचा खडा ,पडद्यामागे काय घडलं?

MAHASARKARIYOJANA
0

अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार, महायुतीत मिठाचा खडा , पडद्यामागे काय घडलं?

महायुतीतील घडामोडींची आतील कथा आता उघड होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वाटपावरून मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे महायुतीत नाराजीचे नाट्य घडल्याची चर्चा आहे.

ajit pawar devendra phadanvis meet


महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे, तर सत्ताधारी महायुतीच्या तिन्ही घटकपक्षांमध्ये नाराजीचे नाट्य रंगलेले दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली आहे. अजित पवार यांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे महायुतीत नाराजीचे नाट्य रंगल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीला तीन महिने बाकी असताना महायुतीच्या घटकपक्षांमध्ये सुरू असलेल्या या घडामोडी महायुती सरकारसाठी घातक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे.

महायुतीत नेमके काय नाराजीचे नाट्य सुरू आहे? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याची माहिती मिळत आहे. नुकतीच काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे समजते. अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री असल्याने त्यांच्या परवानगीनेच सर्व खात्यांना निधी दिला जातो. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी देण्यावरून वाद उफाळल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार


मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय घडले?

मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, आणि मंत्री विजयकुमार गावित यांनी अजित पवारांकडे अधिक निधीची मागणी केली होती. पण अजित पवारांनी अधिकचा निधी देण्यास नकार दिल्यामुळे बैठकीत वातावरण तापले होते. अजित पवार आणि या तिन्ही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बैठकीत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली की, सात महत्त्वाच्या योजना राबविण्यात येत असल्यामुळे एक लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. निधी देण्यास नकार दिल्याने तिन्ही मंत्री नाराज झाले आणि त्यांनी अजित पवार यांच्या बाबतची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. या बैठकीनंतर महायुतीत आणखी हायव्होल्टेज घडामोडी घडल्या आहेत.

अजित पवार यांचा मंत्र्यांना निधी देण्यास स्पष्ट नकार


अजित पवार अमित शाह यांना भेटले

मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्यानंतर अजित पवार थेट दिल्लीला गेले आणि तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. तसेच बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या नाराजी नाट्याबाबतची चर्चा झाल्याचीही शक्यता आहे.

पडद्यामागे काय घडलं?


देवेंद्र फडणवीस अजित पवार यांना भेटले

यानंतरही घडामोडी थांबल्या नाहीत. अजित पवार दिल्लीतून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले. त्यामुळे या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून तिन्ही पक्षांत वेगवेगळे दावे केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाला अजित पवार जबाबदार असल्याचे चित्र काही जणांकडून निर्माण केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे महायुतीत नाराजीचे नाट्य रंगलेले दिसते. या सर्व घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस महायुती एकसंघ राहण्यासाठी परिस्थिती कशी हाताळतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)