बिग बॉस 17’ची ट्रॉफी पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न?

MAHASARKARIYOJANA
0

बिग बॉस 17’ची ट्रॉफी पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न?

बिग बॉस 17 च्या ग्रँड फिनालेआधी कलर्स टीव्हीने ट्रॉफीची झलक दाखवली आहे. ही ट्रॉफी काहींना हटके वाटली, तर काहींना ती अजिबात आवडली नाही. आज (रविवारी) संध्याकाळी 6 वाजल्यापासून बिग बॉसचा ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. टॉप 5 स्पर्धकांमध्ये विजेतेपदाची चुरस रंगली आहे.


बिग बॉस 17’ची ट्रॉफी

मुंबई, 28 जानेवारी 2024: 17 स्पर्धकांसोबत सुरू झालेल्या बिग बॉस 17 या लोकप्रिय शोचा प्रवास आज (रविवारी) संपुष्टात येणार आहे. जवळपास 105 दिवसांनंतर या सिझनचा विजेता घोषित होणार आहे. बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे करणाऱ्या स्पर्धकांच्या शर्यतीत मुनव्वर फारूकी, अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांचा समावेश आहे. बिग बॉस 17 च्या ट्रॉफीची पहिली झलक समोर आली आहे. यंदाचा सिझन दिल, दिमाग आणि दम या थीमवर आधारित होता आणि त्याच थीमला अनुसरून बिग बॉसचं घर डिझाइन करण्यात आलं होतं. आता ट्रॉफीवरही हीच थीम पहायला मिळतेय. ट्रॉफीमध्ये तीन रंगांचा समावेश आहे. लाल रंग दिलाचे प्रतीक आहे, निळा रंग दिमागाचे प्रतीक आहे आणि हिरवा रंग धमकाचे प्रतीक आहे. बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले आज संध्याकाळी 6 वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे. सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करत आहेत.


बिग बॉस 17’ची ट्रॉफी

बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले आज संध्याकाळी 6 वाजता कलर्स टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या फिनालेमध्ये मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा हे पाच स्पर्धक सहभागी होणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 17 विजेत्याला 50 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. यासोबतच त्यांना एक कार देखील मिळू शकते. ह्युंडाई क्रेटा SUV ही कार विजेत्याला मिळणार आहे. विजेत्याला बक्षिसाची रक्कम मिळण्यापूर्वी सुटकेसचा ट्विस्ट पहायला मिळेल. बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांना 10 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची ऑफर दिली जाईल. हे पैसे घेऊन त्या स्पर्धकाला माघार घेता येईल. त्यामुळे मूळ बक्षिसाची रक्कम कमी होऊ शकते. सध्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार, मुनव्वर फारुकी विजेते ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर अंकिता लोखंडे आणि अभिषेक कुमार यांची क्रमवारी आहे. अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा हे दोघं सध्या बॉटम 2 मध्ये आहेत. बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले कलर्स टीव्ही आणि जियो सिनेमावर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत हा फिनाले सुरू राहणार आहे. यंदा बिग बॉसच्या घरात फिनालेची ग्रँड पार्टीसुद्धा होणार आहे.






Post a Comment

0Comments

Post a Comment (0)